Jalna Crime : अट्टल चोरट्यांकडून २६ दुचाकी जप्त! लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Jalna Crime : अट्टल चोरट्यांकडून २६ दुचाकी जप्त!

दुचाकी चोरून त्यांची चोरटी विक्री करणाऱ्या दोघांना जालन्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रामधन रुपचंद बालोद आणि पवन प्रताप पिंपळे अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपींची नावं आहेत.

लक्ष्मण सोळुंके

जालना : दुचाकी चोरून त्यांची चोरटी विक्री करणाऱ्या दोघांना जालन्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रामधन रुपचंद बालोद आणि पवन प्रताप पिंपळे अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपींची नावं आहेत. हे आरोपी जालना, औरंगाबाद नाशिक जिल्ह्यासह परिसरातून दुचाकी चोरुन आणून त्याची विक्री ग्रामीण भागात करत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती.

हे देखील पहा :

त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी दुचाकी चोरून विक्री करत असल्याची कबुली दिली. या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी 12 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 26 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहे. जप्त करण्यात आलेल्या दुचाकी या दुचाकी जालना, औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यातून चोरण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिलीय.

आरोपी रामधन रुपचंद बालोद शिंदेबनवाडी (ता.भोकरदन) आणि पवन प्रताप पिंपळे पळसखेडा पिंपळे (ता.भोकरदन) यांच्या विरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत असून या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT