Jalna Court, Jalna, BJP Corporator Ddnyaneshwar Dhobale saam tv
महाराष्ट्र

BJP Corporator : शाईफेक प्रकरण भाेवलं; भाजप नगरसेवकास एक वर्ष कैदेची शिक्षा

या निकालानंतर जालना पालिकेत एकच खळबळ उडाली.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : पालिका अधिकारी यांच्या अंगावर शाई फेकल्या प्रकरणी न्यायालयाने भाजप नगरसेवकास एक वर्षाची कैद सुनावली आहे. ज्ञानेश्वर रावसाहेब ढोबळे (dnyaneshwar dhobale) असे शिक्षा झालेल्या भाजपा नगरसेवकाचे नाव आहे. जालना (jalna) जिल्हा व सत्र न्यायालयात (court) ढाेबळेच्या खटल्यावर सुनावणी सुरु हाेती. त्याचा निकाल नुकताच लागला.

दाेन जून 2018 रोजी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर हे स्थायी समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीला जात असताना नगरसेवक ढोबळे यांनी त्यांना रस्त्यात अडवून धक्काबुकीं करत त्यांच्या अंगावर शाई फेकली होती. या घटनेनंतर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पोलिसांत (police) ढाेबळेंची तक्रार नाेंदवली हाेती. (Maharashtra News)

पोलिसांनी ढाेबळेवर गुन्हा दाखल करुन घटनेचा तपास केला. या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायालयात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयाने नगरसेवक ज्ञानेश्वर रावसाहेब ढोबळे यास एक वर्षाची कैद व एक हजार रुपये दंडची शिक्षा सुनावली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT