Crime news update Saam TV
महाराष्ट्र

Jalna : चांदईतील राड्याप्रकरणी ३०२ जणांवर गुन्हा दाखल; गाेळीबारात १० जखमी

गावात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे ग्रामस्थांनी नमूद केले.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यातील (jalna) चांदई एक्को (chandai येथे गावच्या (village) प्रवेशद्वाराला नाव देण्यावरून दोन समाजात नुकताच राडा झाला. त्यामुळे गावात माेठ्या प्रमाणात पाेलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाेलीसांनी (police) या प्रकरणी व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याने हसनाबाद पोलिस ठण्यात (hasanbad police station) ३०२ लाेकांवर गुन्हा दाखल केला आहे. (jalna chandai latest marathi news)

चांदाेई एक्काे येथे गुरुवारी झालेल्या दगडफेकीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस कर्मचारी रवी आव्हाड यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख तसेच पोलिसांनी अश्रूधूरच्या नळकांड्या फाेडल्या आणि गोळीबार केला. यामध्ये दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीसांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेत पोलीसांच्या वाहनासह अग्निशमन विभागाच्या (fire brigade) दोन वाहने आणि काही शासकीय वाहनांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी २५० जणांविरुद्ध कलम ३०७, ३५३ अन्वेय गुन्हा दाखल केला आहे. याबराेबरच १२ जणांविरुद्ध धार्मिक भावना दुखवून दोन समाजात तेड निर्माण करून दंगल घडून आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच ५० जणांविरुद्ध रस्त्यात टायर पेटवून आग लावल्या प्रकरणी व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याने हसनाबाद पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

DA Hike 2026 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये थेट 3% वाढ? पगारात होणार एवढी वाढ

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

SCROLL FOR NEXT