Nandurbar Band, Jalna, Maratha Kranti Morcha, Maratha Reservation saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Band: नंदूरबार बंद, एसटी सेवा ठप्प; मराठा समाज आज रास्ता राेकाे आंदाेलन छेडणार

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज (शनिवार) सकाळच्या सुमारास जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदाेलकांची भेट घेतली.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar Band News : जालना येथील अंतरवाली सराटी (antarwali sarati) येथे मराठा समाज आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (शनिवार) नंदूरबारची बंदची हाक देण्यात आली आहे. जालन्यातील घटनेनंतर अज्ञातांनी एसटी महामंडळाच्या बसला लक्ष केले हाेते. त्यामुळे नंदूरबार शहार बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने सेवा बंद ठेवली आहे. (Maharashtra News)

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज नंदुरबार शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नेत्रक-शेवाळी महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन करण्यात येणार आहे. दरम्यान आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील चार ही एसटी आगारांतून एक ही बस सुटणार नसल्याचे एसटी महामंडळाने घाेषित केले आहे.

दरम्यान जिल्ह्यातील बसेस बंद राहिल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. तसेच महामंडळाचे आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

SCROLL FOR NEXT