Jalna Accident News Saam TV
महाराष्ट्र

Jalna Accident News: मांगिरबाबाच्या यात्रेला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; तरुण जागीच ठार, ५ जण जखमी

Jalna Accident News: जालना जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भक्तीभावाने मांगिरबाबाच्या यात्रेला निघालेल्या कुटुंबियावर अचानक काळाने घाला घातला.

साम टिव्ही ब्युरो

Jalna Accident News: जालना जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भक्तीभावाने मांगिरबाबाच्या यात्रेला निघालेल्या कुटुंबियावर अचानक काळाने घाला घातला. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बसने त्यांच्या चारचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघात एकाचा मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले. (Breaking Marathi News)

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जालना ते देऊळगाव राजा दरम्यान जामवाडी गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, अपघातानंतर संतप्त जमावाने बसवर दगडफेक करत काचाही फोडल्याची माहिती आहे.

विजय कौतीकराव जाधव (वय ३५ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या चारचाकी चालकाचे नाव आहे. तर वैभव जाधव हा १३ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे .(Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, जाफराबाद (Jalna News) तालुक्यातील शिराळा येथील जाधव कुटुंब आज १८ एप्रिल रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेसाठी निघाले होते. ७ ते ८ जणांचे एकत्रित कुटुंब मोठ्या उत्साहाने यात्रेसाठी जात असताना जालन्याजवळ समोरून येणाऱ्या बसने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भयानक होता की या अपघातात मॅक्झिमा चालक विजय कौतीकराव जाधव (वय ३५ वर्ष) हे जागीच ठार झाले. तर गाडीमधील ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. अपघात झाल्याच्या मोठ्या आवाजाने रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष गेले आणि एकच धावपळ सुरू झाली.

आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत गाडीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर बस दुभाजकावर जाऊन आदळली होती. यावेळी संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT