Chalisgaon
Chalisgaon Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: जिल्‍ह्यात उष्‍माघाताचा आणखी एकाचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

मेहूणबारे (जळगाव) : येथील 48 वर्षीय शेतमजुराचा शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास उष्माघाताने मृत्यु झाला. उष्‍माघाताचा चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यात पहिला बळी गेला आहे. (jalgoan news Another died of heatstroke in the jalgaon district)

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पार सतत वाढत असल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घराबाहेर न पडता सावलीचा व थंड पेयाचा आधार घेत आहेत. शहरासह ग्रामीण भागात जवळपास 40 पेक्षा अधिक अंश सेल्सियसवर पारा गेला असून अशा स्थितीत सर्वच जण उष्णतेने हैराण झाले आहेत. मेहूणबारे (ता.चाळीसगाव) येथील सुंदरलाल सुकदेव गढरी (वय 48) हा शेतमजूर बकऱ्या चारण्यासाठी गेला होता.

दवाखान्‍यात नेत असतानाच मृत्‍यू

नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी गेला असता दुपारी दीड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आल्याने ते घरी आले. त्यांना डॉक्टरकडे नेले जात असतांनाच त्याचा मृत्यु झाला. खाजगी डॉक्टरांनी त्यांना तपासले असता उष्माघाताने मृत्यु झाल्याचे सांगितले.

परिवार उघड्यावर

मृत सुंदरलाल गढरी यांची घरची परिस्थिती बेताची व गरीबीची होती. मोलमजुरी करून तसेच बकऱ्या चारून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बकऱ्या चारण्यासाठी गेले आणि दुपारी अचानक चक्कर आले. त्यामुळे ते घरी आले आणि त्यांचा मृत्यु झाला. या घटनेने मेहूणबारेसह परिसराव एकच शोककळा पसरली आहे. मृत गढरी यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oil Free Diabetes Thali : रक्तातील साखर १०० टक्के वाढणार नाही; घरीच बनवा ऑइल फ्री डायबिटीज थाळी

Jalgaon Accident : दुचाकी कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

DCW Employees Fired: दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचारी बडतर्फ.. उपराज्यपालांची मोठी कारवाई; कारण काय?

Ajit Pawar: तुमच्या घरी ४० वर्षे राहिली, तरी तिला बाहेरची समजाल का? सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत अजित पवारांचा सवाल

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: ओमराजेंचा तानाजी सावंतांवर रुग्णवाहिका घाेटाळ्याचा आराेप, महायुतीकडून ओमराजेंना 'हे' सवाल, Video

SCROLL FOR NEXT