jalgaon zp
jalgaon zp 
महाराष्ट्र

वर्षभरानंतर पुन्‍हा आदेश; अवैध गौण खनिज प्रकरणी होणार गुन्‍हे दाखल

Rajesh Sonwane

जळगाव : जिल्हा परिषद मालकीच्या पाझर तलावातून अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाच्या नावे बनावट वाळूच्या पावत्या बनवून शासनाची फसवणूक केली होती. या प्रकरणी चार तालुक्‍यांत अपहार झाल्‍याचे निष्‍पन्न झाले असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ पंकज आशिया यांनी दिले. यात १४ कंत्राटदार व जिल्‍हा परिषदेच्‍या लघुसिंचन विभागाशी संबंधित उपविभागातील अभियंत्‍यांचा समावेश आहे. (jalgaon-zilha-parishad-news-Crimes-will-be-filed-in-the-case-of-illegal-minor-minerals)

अवैध गौण खनिज प्रकरणात बोगस पावत्यांसाठी राजमुद्रेचा गैरवापर झाल्याबाबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांचा पाठपुरावा सुरू होता. जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत १५ नोव्‍हेंबरला सबंधित कंत्राटदारांवर फौजदारी गुन्‍हे दाखल करून व्‍याजासह रक्‍कम वसूल करण्याचे आदेश काढले आहेत. तर डेप्‍युटी इंजिनिअरवरील कारवाईबाबतचा प्रस्‍ताव शासनाकडे पाठविला आहे. तसेच ज्‍युनिअर इंजिनिअर, शाखा अभियंता यांना नोटीस बजावून याबाबत खुलासे देण्याचे देश दिले.

वर्षभरानंतर आदेश

गौण खनिज प्रकरणात जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी चौकशी करून संबंधितांवर गुन्‍हे दाखलचे आदेश २५ नोव्‍हेंबर २०२० ला तत्‍कालीन सीईओ डॉ. पाटील यांना काढले होते. परंतु त्‍या वेळी टाळाटाळ झाली होती. यानंतर आता वर्षभरानंतर गुन्‍हे दाखलचे आदेश काढले आहेत.

६३ लाख ५० हजारांची वसुली

अवैध गौण खनिज प्रकरणात जळगाव, एरंडोल, भडगाव, पाचोरा तालुक्‍यांतील लघुसिंचन विभागाशी संबंधित विविध साठवण बंधारे, सिमेंट नाला बंधारे, कोल्‍हापूर पद्धतीने दुरुस्‍ती अशी विविध ३६ कामांमधील रॉयल्‍टीची रक्‍कम न भरता त्‍याच्‍या बनावट पावत्या दाखवून ६३ लाख ५० हजार ४११ रुपयांची अफरातफर झाली आहे. ही सर्व रक्‍कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले.

अभियंतेही रडारवर

या प्रकरणी १४ कंत्राटदारांवर गुन्‍हे दाखल करून त्‍यांच्‍याकडून रक्‍कम वसुलीचे आदेश आहेत. तसेच सर्व कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सीईओंनी दिले. याच प्रकरणात तीन डेप्‍युटी इंजिनिअर, एक ज्‍युनिअर इंजिनिअर व पाच शाखा अभियंताचा समावेश आहेत. तर यामध्‍ये एका निवृत्त अभियंत्‍याचाही समावेश आहे. या अभियंत्‍यांविरोधातही गुन्‍हे दाखल होणार आहे.

गौण खनिज प्रकरणात आणखी सखोल चौकशी जिल्‍हाभरात व्‍हावी. चार तालुक्‍यांतील दोषींवर तत्‍काळ गुन्‍हे दाखल करून अभियंत्‍यांना निलंबित करावे. तसेच या प्रकरणी संपूर्ण रॅकेट उद्‌ध्‍वस्‍त करावे.

– पल्‍लवी सावकारे, सदस्‍य जिल्‍हा परिषद, जळगाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT