Yawal News Saam tv
महाराष्ट्र

Yawal News : धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून मृत्यू; यावल तालुक्यातील निंबादेवी येथील घटना

Jalgaon News : सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या निंबा देवी येथील धरण पावसामुळे प्रवाहित झाले असल्याने येथे अनेकजण येत असतात

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील निंबादेवी धरण पावसामुळे प्रवाहित झाले आहे. यामुळे येथे अनेकजण पर्यटनासाठी जात असतात. दरम्यान याठिकाणी मित्रांसह पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. 

यावल (Yawal) तालुक्यातील निमगाव येथील वेदांत पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. निमगाव येथे आई- वडील, बहिण यांच्यासह राहत होता. वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान (Satpuda) सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या निंबा देवी येथील धरण पावसामुळे प्रवाहित झाले असल्याने येथे अनेकजण येत असतात. त्यानुसार रक्षाबंधननिमित्त सुट्टी असल्यामुळे निमगावातील काही तरुणांसोबत वेदांत पाटील हा निंबादेवी धरण येथे पोहोचण्यासाठी गेला होता. धरणाच्या सांडव्याच्या पाण्यामध्ये असलेल्या खड्ड्यात त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडल्याने बुडायला लागला. 

वेदांत हा बुडत असल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केली. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतळी. मात्र तोपर्यंत वेदांत हा पाण्यात बुडाला होता. नागरिकांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

कपडे ठेवताना तुम्हीही करताय का 'ही' मोठी चूक? कपाट खराब होण्याआधी आजच जाणून घ्या सोप्या टिप्स

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

SCROLL FOR NEXT