Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू

मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : विहिरीत गाळ काढण्यासाठी उतरलेल्या मजुराच्या अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने त्याखाली दबून मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मुबारक रमजान तडवी असे या मृत मजुराचे नाव असून (Jalgaon News) तो हिंगोणा (ता. यावल) येथील रहिवासी आहे. याबाबत फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Live Marathi News)

हिंगोणा (ता. यावल) येथील मजूर मुबारक रमजान तडवी (वय ३२) हा १७ फेब्रुवारी शेतकरी हुना चोपडे यांच्या हिंगोणा शिवारातील शेतातील विहिरीमधील गाळ काढण्याच्या कामासाठी गेलेला होता. रात्री एकच्या सुमारास तो विहिरीवर काम करीत असताना मुबारक तडवीच्या अंगावर मातीचा ढिगारा पडून त्या खाली दबून गुदमरून त्याचा दुदैवी मृत्यू झाला. याबाबत शेतमालक हुना चोपडे यांनी दिलेल्या माहितीवरुन फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

घरातील एकमेव कमावता व्यक्ती गेला

यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन केले. मृत मुबारक तडवी यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. मुबारक तडवी हा त्याच्या घरातील कमावता एकमेव व्यक्ती होता. त्याच्या मजुरीवरच त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत होता. शासनातर्फे त्यांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Viral Video: स्टंटगिरी आली जिवाशी! किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकाला भल्या मोठ्या लाटनं खोल समुद्रात ओढलं, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Maharashtra Politics: पुन्हा राज्यात भूकंप होणार? मविआच्या बैठकीत २३ आमदारांची दांडी, ठाकरेंचा काँग्रेस- राष्ट्रवादीला थेट सवाल

दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT