Yawal News Saam tv
महाराष्ट्र

Yawal News : ट्रकचा दोर बांधताना तुटली आयुष्याची दोर; खाली पडल्याने चालकाचा मृत्यू

Jalgaon News : यावल शहरापासून काही अंतरावर असलेल्या चोपडा रस्त्यावर महाजन पेट्रोल पंपाजवळ ट्रक थांबवून चालक ट्रकवरील ताडपत्रीला दोर बांधत होता.

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : ट्रकच्या वर ताडपत्रीचा दोर बांधण्यासाठी चालक वर चढला होता. मात्र दोर बांधत असताना (Jalgaon) तोल जाऊन खाली पडल्याने चालकाचा जागीच (Death) मृत्यू झाल्याची घटना १८ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास चोपडा रस्त्यावर घडली. (Maharashtra News)

यावल (Yawal) शहरापासून काही अंतरावर असलेल्या चोपडा रस्त्यावर महाजन पेट्रोल पंपाजवळ ट्रक थांबवून चालक ट्रकवरील ताडपत्रीला दोर बांधत होता. दरम्यान, ताडपत्री बांधत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो सरळ रस्त्यावर कोसळला. त्यात त्याच्या डोक्याला मर लागला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर सोबत असलेल्या ट्रकवरील क्लीनर उपेंद्र राजकुमार चव्हाण याने आरडाओरड केल्याने नागरिक जमले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर तेव्हा घटनास्थळी काही नागरिक जमले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे हे पथकासह दाखल झाले. मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मृत संतोष याचे कुटुंबीय इंदूर येथे राहत असून, त्यांच्या कुटुंबाला या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत यावल पोलिसात या दुर्घटनेसंदर्भात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT