Yawal Crime News Saam tv
महाराष्ट्र

Yawal Crime News : किरकोळ वादातून शस्त्राने वार करत हत्या; हत्येनंतर मारेकरी पोलिसात जमा

Jalgaon News : दोन्ही १९ वर्षीय संशयितांनी इम्रानचा खून केल्याची कबुली दिली. प्राथमिक चौकशीत पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे संकेत मिळाले आहेत. संशयितांपैकी एकाकडून इम्रानने दोन हजार रुपये घेतले होते

Rajesh Sonwane

यावल (जळगाव) : किरकोळ कारणातून वाद निर्माण होऊन एका युवकाची दोघांनी मिळून हत्या केल्याची घटना यावल तालुक्यातील विरावली– दहिगाव रस्त्यावरील खिरवड नाल्याजवळ घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर दोघे मारेकरी स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर होत त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत तपास सुरु केला आहे. 

यावल तालुक्यातील दहीगाव येथील इम्रान युनूस पटेल (वय १९) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची घटना शुक्रवारी (२९ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास घडली आहे. इम्रान पटेल हा मूळचा धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे येथील रहिवासी आहे. मात्र त्याचे आजोबा इसा हिराजी पटेल हे वृद्ध असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी तो मागील दोन वर्षांपासून दहिगाव येथील सुरेशआबा नगरात राहत होता.

वाद झाल्याने शस्त्राने वार 

दरम्यान २९ ऑगस्टला रात्री ज्ञानेश्‍वर गजानन पाटील (वय १९) व गजानन रवींद्र कोळी (वय १९) यांनी इम्रान यास रात्रीच्या सुमारास गाठले. यावेळी त्यांच्यात वाद झाला असता दोघा संशयितांनी इम्रान याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून केला. यानंतर दोघेजण स्वतःहून यावल पोलीस स्टेशनमध्ये जमा होत. इम्रान याची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

खुनाचा गुन्हा दाखल 
युनूस इसा पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित ज्ञानेश्वर गजानन पाटील (१९) व गजानन रवींद्र कोळी (१९) या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान दहिगाव येथील इम्रान पटेल या युवकाच्या हत्या प्रकरणी संशयितांना येथील न्यायालयात उपस्थित केले असता संशयित आरोपींना चार सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT