Varangaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Varangaon Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू, दोनजण जखमी

Jalgaon News : दुचाकीवर चालक साजीद अहमद याने उलट्या बाजूने भरधाव चालवीत धडक दिली. त्यात दादाराव जमदाडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू

Rajesh Sonwane

वरणगाव (जळगाव) : राष्ट्रीय महामार्गावरून रात्री विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात वरणगाव येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. याबाबत वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

वरणगावजवळ (varangaon) महामार्गावर झालेल्या अपघातात मन्यारखेडा येथील दादाराव नारायण जमदाडे (वय ३६) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दादाराव जमदाडे हा दुचाकीने दीपनगर येथून रात्री बाराला ड्यूटी संपल्याने घरी वरणगावला येत होता. यावेळी त्यास समोरून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या दुचाकीवर चालक साजीद अहमद याने उलट्या बाजूने भरधाव चालवीत (Accident) धडक दिली. त्यात दादाराव जमदाडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  

तर दुसऱ्या दुचाकीवरील साजीद अहमद याच्यासह त्याच्यासोबत असलेला इसम जखमी झाले. याबाबत सूर्यभान भिवराव जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात साजीद अहमदविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख, एएसआय मनोहर पाटील व प्रमोद कंखरे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT