Jalgaon Train Accident Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon Train Accident: जळगावात मोठा रेल्वे अपघात; एक्स्प्रेसमध्ये आगीच्या भीतीनं प्रवाशांनी मारल्या उड्या, समोरून येणाऱ्या ट्रेननं उडवलं!

Pushpak Express Accident: जळगावच्या परधाडे स्टेशनजवळ मोठा रेल्वे अपघात झाला आहे. धावत्या ट्रेनमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने या प्रवाशांना धडक दिली.

Priya More

जळगावमधील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेसच्या डब्यातून धूर निघाल्यानंतर आगीच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिशेकडून येणाऱ्या एक्स्प्रेसनं त्या प्रवाशांना उडवलं. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये ५ ते ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृत्यूचा आकडा आठपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

जळगावमधील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ हा भयंकर अपघात घडल्याची माहिती आहे. पुष्पक एक्स्प्रेसमधून अचानक धूर निघू लागला. एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची भीती प्रवाशांमध्ये पसरली. त्यातील काही प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेच्या रुळांवरून बेंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं रेल्वे ट्रॅकवर उतरलेल्या काही प्रवाशांना उडवलं. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेस अचानक थांबली. त्यामुळं ठिणग्या उडाल्या आणि धूर निघू लागला. एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याचा समज काही प्रवाशांचा झाला. त्यातील अनेकांनी भीतीपोटी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून बेंगळुरू एक्स्प्रेस जात होती. या एक्स्प्रेसने काही प्रवाशांना उडवलं. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

नेमकं काय घडलं?

जळगावच्या परधाडे गावाजवळ हा अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेस ही लखनऊकडून मुंबईकडे येत होती. एक्स्प्रेस ब्रेक दाबल्याने ठिणग्या उडाल्या. आग लागल्याच्या भीतीनं पुष्पक एक्स्प्रेसमधून ३५ ते ४० प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी बाजूच्या रुळांवरून येणाऱ्या बेंगळुरू एक्स्प्रेसने काही प्रवाशांना उडवलं. यात अनेकांचा बळी गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सहा ते सात जणांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT