Jalgaon Temperature Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Temperature: फेब्रुवारीच्‍या शेवटी उष्णतेची लाट; दुपारीच जाणवू लागल्‍या उन्‍हाच्‍या झळा

फेब्रुवारीच्‍या शेवटी उष्णतेची लाट; दुपारीच जाणवू लागल्‍या उन्‍हाच्‍या झळा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : उन्‍हाळ्यात मे महिन्‍यामध्‍ये महाराष्‍ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यात होत असते. त्‍याची चाहूल आतपासून लागायला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस तापमान (Temperature) नोंदवले असून, दुपारी उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहे. सातत्याने वाढत असलेल्‍या कमाल तापमान फेब्रुवारीच्‍या शेवटीच चाळिशी गाठण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. (Tajya Batmya)

मागील काही वर्षात फेब्रुवारी महिन्‍याच्‍या अखेरपर्यंत हिवाळा लांबत असल्‍याने मार्चच्‍या मध्‍यंतरात उन्हाळा जाणवायला सुरवात होत होती. मार्चच्या सुरुवातीला तापमान ३५ अंशांपुढे जात असे; परंतु यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमानाने ३६ अंशांची पातळी ओलांडली. त्यामुळे उन्हाळा (Jalgaon Temperature) लवकर लागल्याचे जाणवत आहे.

दुपारी चटके, रात्री थंडीफे

कमाल तापमानामध्ये सतत वाढ होत असून, जळगाव जिल्‍ह्यात सध्या पारा ३७ अंशांवर आहे. या आठवड्यात चार ते पाच अंशाने तापमान वाढू शकते. कमाल तापमानात वाढ होऊन आठवड्याच्या शेवटी उन्हाची लाट येऊ शकते. रात्रीचे तापमान मात्र, १० अंशांवर असून थंडी वाजते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: दुपारी वेळ काढून येतो सिमेंट लावायला..., रुग्णालयाच्या बांधकामावरून अजित पवार संतापले; अधिकाऱ्यांना झापलं, VIDEO

Maharashtra Live News Update: २४ तासांच्या आत आरोपीला शोधा, राज ठाकरेंची पोलिसांकडे मागणी

Meenatai Thackeray : शिवसैनिक आक्रमक; दादरमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला | VIDEO

Amruta Deshmukh: तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या...

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाचा धुमाकूळ; शेतातील पिके उध्वस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT