Jalgaon Railway Station Anil Jadhav Death Saam Tv News
महाराष्ट्र

Jalgaon News : पोटच्या लेकाचा बर्थडे ठरला अखेरचा, त्याच पोराच्या डोळ्यासमोर बाप रेल्वेखाली; काळीच चिरणारी घटना

Jalgaon Railway Station Accident : जळगाव रेल्वेस्थानकावर चालत्या रेल्वे चढत असताना तोल गेल्याने एका ३९ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाला.

Prashant Patil

जळगाव : जळगाव येथील रावेर तालुक्यात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. रावेर येथे जाण्यासाठी कामयानी एक्स्प्रेसमध्ये चढताना तोल गेला आणि चाकाखाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अनिल जाधव असं या व्यक्तीचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी सासुरवाडीला मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाधव परिवार आले होते. त्यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

जळगाव रेल्वे स्टेशनवर चालत्या रेल्वे चढत असताना तोल गेल्याने एका ३९ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी १० मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. मंगळवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

अनिल जाधव हे रावेर शहरात पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत राहत होते. मजूरीचं काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी अनिल जाधव त्यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथील सासुरवाडीला पत्नी आणि मुलासोबत आलेले होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सोमवारी १० मार्च रोजी रात्री ९ वाजता जळगाव रेल्वे स्टेशनवर रावेर येथे जाण्यासाठी आले होते.

कामयानी एक्स्प्रेसमध्ये चढत असताना त्यांचा तोल गेल्याने ते रेल्वेखाली आले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल जाधव यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT