Jalgaon Reelstar Murder Case Saam Tv News
महाराष्ट्र

Vicky Patil Murder : सासऱ्यांना शर्टाचं बटणही लावता येत नव्हतं, माझ्या नवऱ्याला... ; विक्की पाटील हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

Jalgaon Vicky Patil Murder Case Twist : जळगावच्या एरंडोलमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. विक्की पाटील याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे खळबळ माजली आहे.

Prashant Patil

जळगाव : प्रसिद्ध रीलस्टार विक्की पाटील याची त्याच्याच वडिलांनी हत्या केली. आपणच मुलाची हत्या केल्याची चिठ्ठी वडिलांनी लिहिली आणि त्यानंतर त्यांनी स्वत:चंही जीवन संपवलं. जळगावच्या एरंडोलमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. विक्की पाटील याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे खळबळ माजली आहे.

माझ्या सासऱ्यांना शर्टाचं बटणही लावता येत नव्हतं, माझ्या पतीची हत्या सासऱ्यांनी नाही तर त्यांच्या काकांनी केल्याचा आरोप मयत विक्कीच्या पत्नीने केला आहे. दुसरीकडे विक्की पाटील याच्या आईने मात्र माझ्या पतीनेच मुलाचा खून करून स्वत:ही जीवन संपवल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास करण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर येऊन ठाकलं आहे.

माजी सैनिक असलेल्या विठ्ठल पाटील यांनी आपल्याच मुलाची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ही गळफास लावून घेतला, पण या प्रकरणाचे नेमके कारण समोर आले नव्हते. आता मुलाकडून होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी त्यांचा मुलगा विक्की पाटील याची हत्या केली आणि मग स्वत:ही जीवन संपवलं. दारू पिऊन मुलगा मारहाण करायचा म्हणून विठ्ठल पाटील यांनी विक्कीची हत्या केल्याचं विठ्ठल यांच्या पत्नी आणि विक्कीची आई संगीता पाटील यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT