Raver Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Raver Vidhan Sabha : तृतीयपंथीयाचे विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात पहिलं 'पाऊल'; रावेर मतदारसंघातून उमेदवारी

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने शमिभा यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी देखील आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे.

संजय महाजन

जळगाव : तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या माध्यमातून चर्चेत असलेल्या फैजपूर (ता. यावल) येथील शमिभा भानुदास पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाऊल टाकले आहे. वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली असून तृतीयपंथी म्हणून विधानसभेसाठी राज्यातून पहिल्याच आणि एकमेव अशा त्या उमेदवार आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) रिंगणात उतरलेले उमेदवार प्रचारात लागले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील रावेर (Raver) विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने शमिभा यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी देखील आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे. ३९ वर्षीय शमिभा या एम.ए. (मराठी) शिक्षित असून कवी ग्रेस यांच्या साहित्यावर त्या पीएच.डी. करीत आहेत. २८ हजार ३८० रुपयांची ठेव आणि ९५ हजारांची रोकड हाती असणाऱ्या शमिभा यांचा अर्जही वैध ठरला आहे. यामुळे त्या आजपासून प्रचारात व्यस्त झाल्या आहेत.

शमिभा यांचे पूर्वीचे नाव शाम मीना भानुदास पाटील असे होते. त्यांनी नंतर शमिभा असे नाव केले. ३० व्या वर्षी तृतीयपंथी असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि तृतीयपंथी घटकासाठी समोर आल्या. दरम्यान भादली (ता. जळगाव) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अंजली पाटील या तृतीयपंथीने सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज भरला. महिला संवर्गातून भरलेला अर्ज तत्कालिन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविला. त्याविरोधात शमिभा यांनी एल्गार उठवत थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. उच्च न्यायालयाने अंजली पाटील यांचा अर्ज वैध ठरविल्याने तृतीयपंथी घटकाने अर्धा लढा जिंकला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत अंजली पाटील विजयी झाल्या. त्यानंतर शमिभा पाटील या चर्चेत आल्या. आता स्वतः शमिभा या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT