Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : नातेवाईकांकडे जाताना काळाचा घाला; गाडीच्या धडकेत पिता- पुत्राचा मृत्यू, आई- मुलगा गंभीर

Jalgaon News : पाल येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी सकाळी भुसावळ येथून दुचाकीने निघाला. सातपुड्यातील बोर घाटातून जात होते खरगोनकडून येणाऱ्या चारचाकी मालवाहू वाहनाने बडोले यांच्या दुचाकीला जोरदार धडक

Rajesh Sonwane

सावदा (जळगाव) : पाल येथे राहत असलेल्या नातेवाईकांकडे जाणाऱ्या कुटुंबावर काळाने झडप घातली आहे. पालपासून जवळ असलेल्या बोर घाटातून जाताना चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार पित्यासह तीन वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला. तर आईसह अन्य एक मुलगा गंभीर जखमी आहे. 

भुसावळ येथील पिंटू मोहन बडोले (वय ३०) व रितिक बडोले (३) अशी असे अपघातात मृत बापलेकाची नावे आहेत. दरम्यान पिंटू बोडोले त्यांची पत्नी मालूबाई (वय २८) आणि दोन्ही मुले रितिक व टेंगुराम (वय ८ महिने) हे दुचाकीने पाल येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी जात होते. सकाळी भुसावळ येथून बडोले परिवार दुचाकीने निघाला होता. दरम्यान सातपुड्यातील बोर घाट चढत होते. 

घाट रस्त्यात दुचाकीला धडक 

बोर घाटातून दुचाकीने जात असताना खरगोनकडून येणाऱ्या चारचाकी मालवाहू वाहनाने बडोले यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे चारही जण दूरवर फेकले गेले. या भीषण अपघातात पिंटू बडोले व चिमुरडा रितिक यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी मालूबाई व टेंगूराम हे मायलेक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मायलेकांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

वाहन चालक फरार 

दरम्यान बोर घाटात अपघात झाल्यानंतर वाहन चालक फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिस घटनास्थळी येत धडक देणारे वाहन ताब्यात घेतले आहे. दरम्यान आमदार अमोल जावळे यांनी मदतकार्य पोहचवत जखमी मालूबाई व टेंगुरामवर फैजपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT