Parola News Saam tv
महाराष्ट्र

Parola News : पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचा मृत्यू; पारोळा जवळील भोकरबारी धरणातील घटना

Jalgaon News : केवळ खेळण्यासाठी उतरलेल्या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. त्यांच्यासोबत असलेले आश्रम पीर मोहम्मद, इब्राहिम शेख अमीर हे काठावर उभे असल्याचे आपल्या मित्रांना बुडताना पाहून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : पारोळा तालुक्यातील वंजारी शिवारात असलेल्या भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबांचे दर्शन घेण्यासाठी पाच मित्र गेले होते. दरम्यान दर्शन घेतल्यानंतर धरणातील पाण्यात उतरलेले तिन जणांचा बुडून मृत्यू झाला. तर दोघेजण सुदैवाने बचावले आहेत. सदरची घटना ३ जुलैला दुपारी चारच्या सुमारास घडली. 


पारोळा शहरातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज (वय १६), इजाज रजा न्याज मोहम्मद (वय १४), आश्रम पीर मोहम्मद (वय ९), इब्राहिम शेख अमीर (वय १४, सर्व रा. बडा मोहल्ला, पारोळा) व आवेश रजा शेख मोहम्मद (वय १७, रा. मालेगाव जि. नाशिक) हे पाच जण आज शहरापासून जवळ असलेल्या भोकरबारी धरणाच्या काठावरील पीर बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर त्यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज, इजाज रजा न्याज मोहम्मद व आवेश रजा शेख मोहम्मद हे तिघे धरणातील पाण्यात खेळण्यासाठी उतरले. विशेष म्हणजे पाचपैकी कोणालाही पोहता येत नव्हते. 

केवळ खेळण्यासाठी उतरलेल्या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. त्यांच्यासोबत असलेले आश्रम पीर मोहम्मद, इब्राहिम शेख अमीर हे काठावर उभे असल्याचे आपल्या मित्रांना बुडताना पाहून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. यानंतर दोघांनी वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेत घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT