Parola News Saam tv
महाराष्ट्र

Parola News : पैसे काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला लुबाडले; पिशवीतील एक लाख घेऊन चोरटे फरार

Jalgaon News : पारोळा तालुक्यातील वाघरे येथील शेतकरी नीलेश विजय पाटील यांनी चुलत भावाकडून उसनवार एक लाख रुपये भारतीय स्टेट बँकेत मागवले होते

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : शेतातील मक्याचे उत्पादन आल्यानंतर त्याची रक्कम बँकेत ठेवली होती. यातील एक लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्याने पारोळा शहरातील आयसीआयसीआय बँकेतुन काढली. हि रक्कम पिशवीत ठेवल्यानंतर पिशवीमधील एक लाख रुपये चोरून चोरटे फरार झाले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा (Parola News) तालुक्यातील वाघरे येथील शेतकरी नीलेश विजय पाटील यांनी चुलत भावाकडून उसनवार एक लाख रुपये भारतीय स्टेट बँकेत मागवले होते, ते काढून ते जवळच असलेल्या आयसीआयसीआय बँकेत मका विक्रीतून आलेले पैसे काढण्यासाठी गेले. मात्र, ते बँकेत पैसे काढण्याचे काम करीत असताना एक लाख रुपये त्यांनी त्यांच्या पिशवीमध्ये ठेवले व पिशवी त्यांच्या वडिलांजवळ दिली. ते बँकेत (Bank) बसले असताना चोरट्यांनी पिशवीला ब्लेडच्या साह्याने कापून पिशवीमधील एक लाख रुपये लंपास केले. 

कर्ज फेडण्यासाठी काढत होते रक्कम 

हा प्रकार लक्षात आल्यानंतर याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश पाटील यांच्यावर हात उसनवारी कर्ज असल्याने ते स्टेट बँकेतून एक लाख रुपये व आयसीआयसीआय बँकेतून मका विक्रीचे पैसे काढून कर्ज फेडणार होते. त्याआधीच चोरट्याने एक लाखावर डल्ला मारला. बँकेतून रक्कम काढली नसल्याने ते पैसे सुरक्षित आहेत. याबाबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT