Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Parola News : दूषित पाण्यामुळे शेतमजुरांसह २९ जणांना विषबाधा; पारोळा तालुक्यातील घटना

Jalgaon News : पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील शेतशिवारात शेतीकाम करण्यासाठी मध्य प्रदेशातील काहीटन शेतमजूर कामासाठी आले आहेत

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : शिवरे दिगर (ता. पारोळा) येथे शेतातील अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे २९ शेतमजुरांना विषबाधा झाली. (Jalgaon) पाणी पिल्यानंतर सर्वांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना लागलीच तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. प्रथमोपचार केल्याने सर्व शेतमजुरांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र एक वर्षाच्या बाळाला पुढील उपचारासाठी (Dhule) धुळे येथे पाठविण्यात आले आहे. (Live Marathi News)

पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील शेतशिवारात शेतीकाम करण्यासाठी मध्य प्रदेशातील काहीटन शेतमजूर कामासाठी आले आहेत. शेतात काम करीत असताना एका मोठ्या ड्रममध्ये असलेले दूषित पाणी प्यायल्याने त्यांना मळमळ, उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. चेतन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून पारोळा कुटीर रुग्णालयात (Hospital) पाठविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार केले असता आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विषबाधा झालेले रुग्ण 
विक्रम पावरा (वय एक वर्ष) लोकान पावरा (वय ५५), दिवाण मानसिंग पावरा (वय ५०), मिथुन पावरा (५४), कैलास पावरा (१२), नाट्या पावरा ( वय १०), राकेश पवार (२०), हेमा पावरा (२४), जितेंद्र पावरा (२१), प्रेमळ पावला (१२), गीता पावरा (१०), देला पावरा (१०), करीना पावरा (१८), अजय पावरा (१८), सविता पावरा (१८), राधिका पावरा (२), अंजली पावरा (१३), नविता पावरा (२२), दीदी पावरा (१० महिने), अंजना पावरा (३५), ईश्वर पावरा (२५), रविता पावरा (६७), सविता पावरा (५२), राधिका पावरा (२५), तिरका पावरा (३५), दिव्य पावरा (११), हिना पावरा (११) आदींवर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

SCROLL FOR NEXT