Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: भरधाव कारने सायकल चालकाला चिरडले; संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको

Parola News : भरधाव कारने सायकल चालकाला चिरडले; संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : पारोळा शहरातून गेलेय महामार्गावर धरणगाव चौफुलीजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने सायकलस्वारास जोरदार धडक (Accident) देत चिरडले. यात सायकलवरील युवकाचा (Parola) जागीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. (Maharashtra News)

पारोळा शहरतील बायपास हायवेवर सदर अपघात झाला. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजी शामराव मराठे (वय ३५) हा धरणगाव चौफुलीवर रस्त्या ओलांडून शहराकडे सायकलने जात होते. याचवेळी जळगावच्या दिशेने धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने सायकल चालकास जोरदार धडक दिली. यात सायकल चालक शिवाजी हे पंधरा ते वीस फूट अंतरावर फेकले गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच नागरिकांनी धाव घेतली. यावेळी शहरवासीयांनी धरणगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करत गतिरोधक बसवण्याची तसेच विजेची व्यवस्था करण्याची मागणी केली. तर  घटनास्थळी (Police) पोलिसांच्या पथकाने चौफुलीवर जमलेल्या युवकांची समजूत काढत कार चालकावर गुन्हा दाखल करून वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिल्यानंतर  एक तासाने रस्ता मोकळा करण्यात आला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडाऱ्याजवळ वाळू घाटावर भरधाव धावणारा ट्रॅक्टर उलटून चालकाचा दबून मृत्यू

Shocking : नामंकित हॉटेलवर पोलिसांची रेड, रूमचा दरवाजा उघडताच तरुण- तरुणी नको त्या अवस्थेत सापडले

Nauvari Saree Hairstyles: अंबाड्यापासून ते वेणीपर्यंत..., या 5 ट्रेडिंग हेअरस्टाईल्स नऊवारी साडीवर नक्की ट्राय करा

Wage Code: १५ मिनिटे जास्त काम अन् पगार होणार डबल! सरकारचा मोठा निर्णय काय? वाचा नवे नियम

Marathi compulsory: 'मराठी बोलायला लाज का वाटते?'; 'कमळी'फेम अभिनेत्रीचा थेट सवाल, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT