Jalgaon Accident News
Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: भरधाव कारचे टायर फुटल्याने अपघात; मदतीसाठी धावलेल्‍या तरुणाला बसला धक्‍का

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव-पाचोरा रोडवर रामदेववाडीजवळ सुसाट कारच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर (Accident) तरुणांनी मदतीला धाव घेतली अन्‌ स्वतःच्या पित्याचा मृतदेह बघून मुलाने आक्रोश करत हंबरडा फोडला. रमेश मदन राठोड (वय ४५, रा. रामदेववाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कारचालकाला (Jalgaon News) वाहनासह ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत एमआयडीसी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. (Live marathi News)

पाचोऱ्याकडून जळगावकडे येत असलेल्या कार पुढे चालत असलेल्या दुचाकीस्वाराने गाव येण्यापूर्वीच युटर्न घेतला अन्‌ ब्रेक मारतानाच कारचे टायर फटून अनियंत्रित कार दुचाकीवर आदळली. या अपघातात दुचाकीस्वार शेतकरी रमेश मदन राठेाड (वय ४५) दुचाकीसह फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. त्यांच्या दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली.

मदतीला धावून आला मुलगा

अपघाताची माहिती ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. गावाबाहेर उभे असलेल्या तरुणांनी मदतीसाठी घटनास्थळ गाठले. त्या तरुणांपैकी एक मृताचा मुलगा होता. ग्रामस्थांनी कारचालकाला ताब्यात घेतले. पोलिस नाईक स्वप्नील पाटील, प्रदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात हलविला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Leader Avinash Jadhav: सराफ व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितले? मनसे नेते अविनाश जाधवांनी आराेप फेटाळले

Rahul Gandhi News: पराभवाची भिती की रणनिती? राहुल गांधींनी अमेठी मतदार संघ का सोडला? वाचा काँग्रेसच्या खेळीची इनसाईड स्टोरी

Today's Marathi News Live : ठाणे लोकसभेतून नरेश म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज भरला

Thane MNS News | मनसेच्या नेत्याने मागितली खंडणी? पोलिसांकडून गुन्हा दाखल

New Force Gurkha: ऑफ-रोडींगसाठी आहे बेस्ट! पॉवरफुल Force Gurkha भारतात लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT