Pachora News Saam tv
महाराष्ट्र

Pachora News : सोशल मीडियावरून जुळले प्रेम; सोबत राहण्याचा निर्णय पण.., चिमुकल्यासह दोघांची रेल्वेखाली उडी

Jalgaon News : दोघांमधील प्रेम वाढत गेल्याने सोबत राहण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान राजेंद्रची पत्नी माहेरी गेल्यानंतर राधिकाला भातखंडे येथे घरी आणले. आठ ते दहा दिवसांनंतर राजेंद्रच्या घरी कौटुंबिक वाद

Rajesh Sonwane

पाचोरा (जळगाव) : सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून दोघांमध्ये प्रेम जुळले. दोन्ही विवाहित असताना देखील त्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. याकरिता ती घर सोडून आली. मात्र त्यांच्या प्रेमाचा करुण अंत झाला. आठ दिवस सोबत राहिल्यानंतर एका चार वर्षाच्या चिमुकल्यासह दोघांनीही रेल्वेखाली उडी मारत जीवनयात्रा संपविल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथील राजेंद्र मोरे व राधिका ठाकरे असे या दोघांची नावे आहेत. या दोघांनी परधाडे (ता. पाचोरा) रेल्वे स्थानकाजवळ चार वर्षीय सारंगसह रेल्वेखाली आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. दोघेही विवाहित असून त्यांना अपत्य आहेत. दरम्यान राजेंद्र निंबा मोरे भातखंडे येथे मोलमजुरी करून परिवाराचा उदर्निवाह करत होता. सोशल मीडियावरून त्याची ओळख बारामती येथील राधिका लहू ठाकरे हिच्याशी झाली. यात दोघांचे प्रेम जुळले आणि दोघांनी आणाभाका घेतल्या.

गावी परतताना संपविले जीवन 

दोघांमधील प्रेम वाढत गेल्याने अखेर राधिकाने राजेंद्रसोबत राहण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान राजेंद्रची पत्नी माहेरी गेल्यानंतर राजेंद्रने राधिकाला भातखंडे येथे घरी आणले. आठ ते दहा दिवसांनंतर राजेंद्रच्या घरी कौटुंबिक वाद झाल्याने तेव्हा ते घर सोडून निघून गेले. मात्र ५ मे रोजी गावी परतण्याचा निर्णय घेतला असता पाचोरा येथे आले. मात्र, परधाडे शिवारातील रेल्वेमार्गावरून जात असताना दोघांनी धावत्या रेल्वेखाली चार वर्षीय मुलासह उडी घेतली. 

पोलिसांकडून तपास सुरु 

तिघांचे मृतदेह रेल्वे रूळावर छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेले आढळून आले. याबाबत माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर तिघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणले. पोलिसांनी तिघांचा तपास सुरू केला असता, अवघ्या काही तासांत आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण काय? याचा उलगडा झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video:भाच्याच्या लग्नात मामाचा मृत्यू, बेफाम डान्स करताना अचानक कोसळले अन्...!

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

राज्यकर्ते गावात आल्यावर त्यांना रट्टे...; मनोज जरांगेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, काय म्हणाले? VIDEO

Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

SCROLL FOR NEXT