Pachora News Saam tv
महाराष्ट्र

Pachora News; धक्‍कादायक.. पाच महिन्याचे बाळ पोटाला बांधून विवाहितेची विहिरीत उडी; दोन दिवसांपासून होते बेपत्‍ता

धक्‍कादायक.. पाच महिन्याचे बाळ पोटाला बांधून विवाहितेची विहिरीत उडी; दोन दिवसांपासून होते बेपत्‍ता

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : लासगाव (ता. पाचोरा) येथील माहेर व सासर असलेल्या अठरा वर्षीय विवाहितेने पोटाला पाच महिन्याच्‍या बाळाला पोटाला बांधून (Pachora) गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (३० मे) उघडकीस आली. या घटनेमुळे सारे गाव सुन्न झाले असून विवाहितेने (Jalgaon News) हे टोकाचे पाऊल का उचलले? या कारणापर्यंत पोहोचण्याचा पोलीस (Police) प्रयत्न करत आहेत. (Maharashtra News)

लासगाव (ता. पाचोरा) येथील आरिफ खान या तरुणाचा विवाह (Marriage) गावातीलच मामाची मुलगी लाजनाबी हिच्याशी झाला होता. त्यांना मुलगाही झाला होता. सर्व सुरळीत सुरू असताना कुटुंबात किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली असावी व त्यातून विवाहितेने पाच महिन्‍याच्या बाळासह विहिरीत आत्महत्या केल्‍याचा अंदाज बांधला जात आहे. दरम्‍यान २८ मेस लासगाव येथेच समाजातील विवाह सोहळा असल्याने खान कुटुंबियांना विवाहासाठी सहकुटुंब आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी आरिफ खान विवाह सोहळ्यासाठी निघाले. मी बाळाची तयारी करून त्याला सोबत आणते तुम्ही जा; असे लाजीनाबीने सांगितले. यामुळे आरिफ खान आई वडिलांसोबत विवाह सोहळ्यासाठी गेला.

घर बंद असल्‍याने शोधाशोध

बराच वेळ झाला तरी लाजीनाबी विवाहस्थळी न आल्याने आरिफ खान त्यांना पाहण्यासाठी घरी गेले. मात्र घर बंद दिसले. पत्नी लाजीनाबी घरीही नाही व विवाहाच्या ठिकाणीही नाही हे पाहून गावातील काही नातलगांकडे शोध घेण्यात आला. परंतु ते मिळून न आल्याने आरिफ खान यांनी सायंकाळी पाचोरा पोलीस ठाण्यात मुलासह पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी विवाहितेचा शोध सुरू केला असतानाच आज गावालगतच्या शेतशिवारात लाजिनाबीसह पाच महिन्याच्या असदचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.

आत्‍महत्‍या की वेगळे कारण

सदर घटना पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक राहुल खताळ पोलीस हवालदार मुकुंद परदेशी, राहुल बेहरे, दिलीप वाघ, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील सह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. लाजीनाबीने पाच महिन्याच्या गोंडस बाळासह आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत तर्क वितर्क केले जात असून खऱ्या कारणापर्यंत पोहोचण्याचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT