Pachora Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Pachora Bus Accident : बस, ट्रकची समोरासमोर धडक; १३ विद्यार्थ्यांसह २० जखमी

बस, ट्रकची समोरासमोर धडक; १३ विद्यार्थ्यांसह २० जखमी

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : पाचोरा- मोंढाळा रस्त्यावर मौनगिरी साखर कारखान्यासमोर आज (१८ जुलै) सकाळी (Pachora) सव्वासहा वाजेच्‍या सुमारास बस व ट्रकची समोरासमोर (Accident) धडक झाली. त्यात १३ विद्यार्थी बसचालकासह २० जण जखमी झाल्याची घटना घडली. (Live Marathi News)

पाचोरा आगाराची घोसला ते पाचोरा ही मुक्कामी बस प्रवासी व विद्यार्थी घेऊन पाचोऱ्याकडे येत होती. या दरम्‍यान पाचोरा शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर सकाळी सव्वा सहाचे सुमारास समोरून येणाऱ्या ट्रकवर समोरासमोर (Bus Accident) धडकली. अरुंद व खराब रस्ते असल्याने बस व ट्रकचा वेग कमी असल्याने अनर्थ टळला.

पालकांची धावपळ

मुक्‍कामी असलेल्‍या बसने वाडी, शेवाळे, सातगाव डोंगरी, सातगाव तांडा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने पाचोरा येथे आवागमन करतात. १३ विद्यार्थी व ७ प्रवाशी असे २० प्रवासी या बसमध्ये होते. बस व ट्रक अपघाताचे वृत्त शहरासह तालुक्यात पसरल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक, कमालीचे भयभीत झाले व त्यांनी लगबगीने अपघातस्थळ गाठले. तसेच शैक्षणिक संस्थांचे चालक, विविध शाळातील शिक्षक, सेवाभावी संस्था संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनीही घटनास्थळी व नंतर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतल्याने प्रचंड गर्दी व गोंगाट झाला.

बसमधील जखमी विद्यार्थी असे

स्वराज पाटील, विवेक राठोड, गोपाल चव्हाण, नीता राठोड, रोशन परदेशी, सुमित नलवाडे, दीपक पवार, जतीन महाले, पूजा मनगटे प्रतिभा राठोड, रोशनी चव्हाण, ज्योती चव्हाण, पुष्कर पाटील, दिनेश राठोड व दिनेश चव्हाण.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

SCROLL FOR NEXT