Pachora Accident Saam tv
महाराष्ट्र

Pachora Accident : रुग्णालयात जात असताना झाला घात; ट्रकची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Jalgaon News : सना शेख या पती शेख इस्माईल अब्दुल नबी मणियार यांच्यासोबत पाचोऱ्यातील खाजगी रुग्णालयात प्रकृती दाखविण्यासाठी जात होते.

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : पत्नीची तब्येत चांगली नसल्याने त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना काळाने घात केला. दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पतीसह दोनजण जखमी झाले आहेत. हा अपघात पाचोरा शहरात घडला. 

गिरड (ता. भडगाव) येथील सना शेख इस्माईल मणियार (वय २६) असे अपघातात (Accident) मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. सना शेख या पती शेख इस्माईल अब्दुल नबी मणियार यांच्यासोबत पाचोऱ्यातील खाजगी रुग्णालयात प्रकृती दाखविण्यासाठी जात होते. दरम्यान ते पाचोरा (Pachora) येथे पोहचले असताना जारगाव चौफुली येथे रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील सर्वजण खाली पडले. याच वेळी सना शेख या ट्रकखाली आल्याने त्यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. 

तर सोबत असलेले पती शेख इस्माईल मणियार यांचेसह त्यांच्या आई शानुरबी अब्दुलनबी मणियार व ४ वर्षीय महिरा शेख इस्माईल मणियार हे गंभीर जखमी झाले आहेत. नागरीकांनी जखमी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ही एक चूक पडू शकते महागात, मिळणार नाही ₹२०००;लगेच चेक करा अपडेट

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Kalyan Local : धक्कादायक! लोकलमध्ये महिलांचा बेक्कार वाद, एकीने दुसरीच्या दंडाचा कचकन चावा घेतला अन्...

Health Care : निरोगी आयुष्यासाठी दिवसातून किती चपाती खाव्यात? जाणून घ्या

Ahilyanagar Tourism : नगरमध्ये निसर्गाच्या कुशीत लपलाय भव्य किल्ला; इतिहास वाचून अभिमान वाटेल, एकदा जाऊनच या

SCROLL FOR NEXT