Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: भरधाव ट्रॅक्टरचे टायर फुटले; ट्रॅक्‍टर उलटून युवकाचा मृत्‍यू

भरधाव ट्रॅक्टरचे टायर फुटले; ट्रॅक्‍टर उलटून युवकाचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : येथील भडगाव रोड भागात वाळूने भरलेले भरधाव (Pachora) ट्रॅक्टर शहराकडे येत असताना टायर फुटून उलटले. या अपघातात (Accident) ट्रॅक्टरचालक युवक ठार झाला. ही घटना शनिवार (ता. ६) घडली. (Maharashtra News)

पवन पाटील (वय २०) असे मृत युवकाचे नाव असून तो चिंचखेडा खुर्द (ता. पाचोरा) येथील रहिवासी होता. पवन हा ट्रॅक्टरचालक म्हणून काम करत होता. शनिवारी पहाटे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पाचोरा शहराकडे आणताना स्वप्नशिल्प रेसिडेन्सीसमोर ट्रॅक्टरचे टायर फुटले. त्यामुळे त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला व ट्रॅक्टर महामार्गावरील विजेच्या खांबावर आदळून उलटला. त्यात तो ट्रॅक्टर खाली येऊन जागीच ठार झाला.

पवन यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. अमित साळुंखे यांनी त्यास मृत घोषित करून शवविच्छेदन केले. मृत पवन पाटील हा आई, वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याचे वडील हिंमत पाटील हे सारोळा येथे देशमुखांकडे मजुरीचे काम करतात. मयत पवनच्या पश्चात वृद्ध आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे. दरम्यान, अपघातानंतर पवनच्या हितचिंतक व साथीदारांनी लगबगीने रस्त्यावर पडलेली वाळू, ट्रॅक्टर व तुटलेला विजेचा खांब उचलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT