Jalgaon ZP Saam tv
महाराष्ट्र

दिग्गजांचे गणित बिघडले; वाढीव गट, गणांवर २५ हरकती

दिग्गजांचे गणित बिघडले; वाढीव गट, गणांवर २५ हरकती

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १५ पंचायत समित्यांच्या नवीन प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. वाढलेले गट व गणाच्‍या प्रभाग रचनेमुळे अनेक दिग्‍गजांचे गणित बिघडले आहे. या रचनेबाबत काहींचा आक्षेप असून (Jalgaon News) आतापर्यंत २५ हरकती घेण्यात आल्या आहेत. (jalgaon news zilha parishad Increased group 25 objections on counts)

जळगाव (Jalgaon) जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ७७ गट व १५४ गणाची प्रारूप प्रभाग रचना २ जूनला जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक ९ गट व १८ गण असून सर्वात कमी २ गट व ४ गण बोदवड (Bodwad) तालुक्यात आहेत. प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये समाविष्ट ग्रामपंचायती निश्चीत करण्यात आल्या आहेत. त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या.

चाळीसगावमधून सर्वाधिक हरकती

सुधारीत प्रारूप रचनेवर हरकत असल्‍यास मागविल्‍या होत्‍या. त्‍यानुसार आतापर्यंत २५ हरकती आल्‍या असून सर्वाधिक हरकती चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील आहेत. नागरिकांकडून प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेत स्वीकारण्यात येत आहे, असे उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT