Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : रात्री वडिलांकडून पार्सल नेले अन् थोड्यावेळात आली मृत्यूची बातमी; दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : रात्री नऊला अश्विन हा बळीराम पेठ परिसरात वास्तव्यास असलेल्या वडिलांच्या घरून पार्सल घेऊन गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंटमध्ये असलेल्या घरी आला

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरातल्या गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा याचा मृत्यू झाला. सदरची धक्कादायक घटना २५ नोव्हेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव (Jalgaon News) शहरातील मेहरूण परिसरातील अश्विन दीपक चौरसिया (वय ३६) असे दुर्घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. अश्विन हा पत्नी, एक मुलगा व एक मुलगीसह राहत होता. दरम्यान सोमवारी रात्री नऊला अश्विन हा बळीराम पेठ परिसरात वास्तव्यास असलेल्या वडिलांच्या घरून पार्सल घेऊन गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंटमध्ये असलेल्या घरी आला. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास अश्विनचा लहान भाऊ अक्षय याला अश्विनच्या शालकाच्या पत्नीने फोन करून अश्विनने दुसऱ्या माळ्यावरून उडी मारल्याचे सांगितले. 

त्यानंतर कुटुंबीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अश्विनला तपासून मृत घोषित केले होते. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या घटनेत अश्विन इमारतीखाली कसा पडला? की, त्याने आत्महत्या केली, याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT