Mahavitaran Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: वीजबिल वसुलीला गेलेल्‍या कर्मचाऱ्यांना मारहाण; पिता- पुत्राला अटक

वीजबिल वसुलीला गेलेल्‍या कर्मचाऱ्यांना मारहाण; पिता- पुत्राला अटक

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : यावल तालुक्यातील सातोद येथे महावितरणच्या (Mahavitaran) बिलाची थकबाकी मागणीसाठी वीज कर्मचारी गेले होते. त्याचा राग येऊन पिता- पुत्राने विज कर्मचाऱ्यासह सोबतच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केली. व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून येथील पोलीस ठाण्यात दोघ पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

सातोद (यावल) येथील सुनील भास्कर धांडे यांच्याकडे मंगळवार (ता.७) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीचे थकबाकीचे विजबिल मागणीसाठी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ योगेश प्रल्हाद बारी व सोबतचे कर्मचारी गिरीश सतीश चौधरी गेले होते. या कर्मचाऱ्यांनी धांडे यांना वीज बिल भरण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन सुनील धांडे व त्यांचे पुत्र योगेश सुनील धांडे या दोघांनी वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

पिता-पुत्राला अटक

या संदर्भात योगेश बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात पिता-पुत्रा विरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्‍यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT