Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: परप्रांतीय महिलेवर अत्याचार; फळ विक्री दुकानासाठी जागा दाखविण्याचा बहाणा

परप्रांतीय माहिलेवर अत्याचार; फळ विक्री दुकानासाठी जागा दाखविण्याचा बहाणा

साम टिव्ही ब्युरो

वरणगाव (जळगाव) : रेल्‍वेत झालेल्‍या ओळखीतून महिलेला दुकान मिळवून देण्याचे सांगितले. यानंतर वरणगाव (Varangaon) आयुध निर्माणीत नोकरीस असलेल्या डीएससी विभागाच्या सुरक्षा रक्षकाने त्‍या परप्रांतीय महिलेवर (Crime) अत्याचार केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. (Letest Update News)

फिरोजाबाद जिल्ह्यातील बालमगड येथील ३२ वर्षीय महिला (Railway) रेल्वेने शिर्डी येथे जात असताना वरणगाव आयुध निर्माणीत कार्यरत असलेल्‍या डीएससी विभागाचा सुरक्षारक्षक सुखदेव राज (रा. जम्मू काश्मीर, ह. मु. वरणगाव फॅक्टरी) याच्याशी ओळख झाली होती. त्या ओळखीतून सुरक्षा रक्षकाने महिलेला आयुध निर्माणी वसाहतीत फळ विक्रीचे दुकान लावण्यासाठी जागा मिळवून देतो, असे आमिष (Crime News) दिले होते.

दुकान पहायला बोलावत केला अत्‍याचार

सुरक्षारक्षकाने दहा दिवसांपूर्वी महिलेला दुकान पाहायला बोलविले. ही महिला नऊ तारखेला वरणगाव फॅक्टरी येथे आली असता त्याने दुकानाची जागा दाखवली. यानंतर राहण्याचे ठिकाण सुद्धा दाखवतो, असे सांगून वसाहतीतील इमारतीत नेऊन तेथे त्याने अतिप्रसंग केला. महिला ओरडली असता जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या महिलेने कशी तरी सुटका करून वरणगाव पोलिस ठाणे गाठले. तिच्या फिर्यादीवरून सुखदेव राज याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT