Accident Saam tv
महाराष्ट्र

दुर्दवी..ट्रकची धडक बालकाचा जागीच मृत्‍यू

दुर्दवी..ट्रकची धडक बालकाचा जागीच मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मोहाडी गावाजवळ भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जात असलेल्‍या बालकाला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली. (jalgaon news truck hit the child and he died on the spot)

मोहाडी येथील सुजय गणेश सोनवणे (वय १३) हा मुलगा आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जळगावहून मोहाडी गावाकडे जात होता. यावेळी गावाजवळील उताराजवळ भरधाव (Accident) ट्रकने (क्र. एमएच २८, बी ७७०३) दुचाकीला (क्र. एमएच १९, डीएम ११) जोरदार धडक दिली. यात बालक हा ट्रकच्‍या चाकाखाली आल्‍याने त्‍याचा जागीच मृत्यू (Accident Death) झाला.

ग्रामस्‍थांची धाव

दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर सुजयचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात (Hospital) आणला असून तेथे आप्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. सुजयचा मृतदेह पाहून आई, वडीलांनी आक्रोश केला. जिल्‍हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकर सोनवणे यांचा तो नातू होता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भीमराव धोंडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

लग्नसराईत सोनं महागलं, चांदीच्या दरानंही उसळी घेतली; आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याचा भाव किती?

३ मुलांचा बाप अन् आईचा आधार; दिल्लीतील बॉम्बस्फोटात बस कंडक्टरचा मृत्यू, कुटुंबाचा आधार हरपला

Jeetendra : जितेंद्र पायरीवरून पडले; सुरक्षा रक्षक अभिनेत्याला उचलण्यासाठी धावले, VIDEO होतोय व्हायरल

Delhi car Blast Live updates : उमरचे 2 भाऊ पोलिसांच्या ताब्यात; 18 मोबाईल जप्त

SCROLL FOR NEXT