Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : ट्रकच्या छतावर चढून दोर सोडताना झाला घात; विजेचा झटका बसून चालकाचा मृत्यू

Rajesh Sonwane

जळगाव : ट्रकमध्ये खत आणल्यानंतर दुकानावर हे खत उतरविण्यासाठी ट्रकच्या छतावर चढून दोर सोडत असताना विजेचा धक्का लागून ट्रक चालकाचा (Death) मृत्यू झाला. सदरची घटना १४ फेब्रुवारीला सकाळी नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी (Jalgaon) जळगाव तालुका पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत नरसिंग प्रल्हाद सूरनार (वय २९, रा. बनवास, जि. परभणी) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. नरसिंग सूरनार हा ट्रक चालक १४ फेब्रुवारीला सकाळी आव्हाणे येथे खताच्या गोण्या घेऊन आला होता. काही दुकानावर खत उतरवण्यासाठी एका ठिकाणी ट्रक थांबवून चालक ट्रकवर चढला व दोर सोडत असताना वीज तारांचा (Electric Shock) स्पर्श होऊन जोरदार विजेचा धक्का लागला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विजेचा जोरदार झटका बसल्याने नर्सिंग सुरनार हा खाली कोसळला. खाली काँक्रिटीकरण केलेला रस्ता असल्याने त्याच्या डोक्याला देखील मार लागला. गावकऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. घटनास्थळी तालुका पोलीस पोहचून पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT