Girna Dam Saam tv
महाराष्ट्र

गिरणा धरण शंभरीच्या दिशेने; नदीपात्रात पाण्याच विसर्ग

गिरणा धरण शंभरीच्या दिशेने; नदीपात्रात पाण्याच विसर्ग

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.१) धरणाचे २ दरवाजे एका फुटाने उघडण्यात आले. त्यातून गिरणा नदीपात्रात (Girna River) पुन्हा पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या ९७.३७ टक्के जलसाठा झाला आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून ओढ दिलेल्या (Rain) पावसाने सलग दोन दिवस तालुक्यातील काही भागात हजेरी लावली. त्यामुळे पिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही जोरदार पावसाची गरज आहे. (Jalgaon News Girna Dam)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यासह मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव (Chalisgaon) शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षांत शंभर टक्के भरण्याकडे आगेकूच करीत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह, शेती, उद्योगाच्या पाण्याचा पुढचा प्रश्न मिटला आहे. नाशिक जिल्ह्यात गिरणा पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जुलैमध्येच इतिहास घडवत गिरणा धरणाने (Girna Dam) नव्वदी गाठली होती. १६ जुलैला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. तेव्हापासून धरणातून विसर्ग सुरू होता. दररोज कमी अधिक प्रमाणात हा विसर्ग सुरू होता. सलग ४२ दिवस धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता. या काळात धरणातून सुमारे १७ हजार दलघमी पाणी नदीत सोडण्यात आले.

गिरणा धरणात पाण्याची आवक पुन्हा वाढल्याने शनिवारी (ता.३) १२२२ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडला जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही पाटबंधारे विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

Chocolate Milkshake Recipe: घरच्या घरी बनवा थंडगार टेस्टी चॉकलेट मिल्कशेक; वाचा सोपी रेसिपी

Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

SCROLL FOR NEXT