Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : गावच्या कारभारीने मक्तेदाराकडून घेतले ८० हजार; एसीबीच्या कारवाईत तिघेजण ताब्यात

Jalgaon News : रिंगणगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे सुमारे एक कोटी ५० लाखांचे काम केले होते. या कामापोटी त्यांना यापूर्वी एक कोटी २७ लाख २३ हजार रुपये मिळाले आहेत

Rajesh Sonwane

जळगाव : गावाचा कारभार सांभाळणारा सरपंच देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचा ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करारनामा करण्यासाठी मक्तेदाराकडून ८० हजारांची लाच घेताना रिंगणगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्येचे पती व एक अशा तिघांना अटक करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे येथे सदरची घटना बुधवारी घडली आहे. सदर प्रकरणात तक्रारदार शासकीय कंत्राटदार असून त्यांनी रिंगणगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे सुमारे एक कोटी ५० लाखांचे काम केले होते. या कामापोटी त्यांना यापूर्वी एक कोटी २७ लाख २३ हजार रुपये मिळाले आहेत. उर्वरित २३ लाखांच्या रकमेचे देयक त्यांनी जिल्हा परिषदेकडे सादर केले आहे. 

करार नाम्यासाठी १ लाखाची मागणी 

पूर्ण झालेल्या कामाचा ताबा ग्रामपंचायतीकडे देण्यासाठी करारनामा अपूर्ण होता. कामाच्या हस्तांतराचा करारनामा करण्यासाठी त्यांनी सरपंच भानुदास पुंडलिक मते (वय ४४) व ग्रामपंचायत सदस्य पती समाधान काशीनाथ महाजन (३८, दोन्ही रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) यांच्याकडे विनंती केली. त्यांनी या कामासाठी एक लाखाची मागणी केली. याबाबत मक्तेदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास लेखी तक्रार दिली. 

तिघांना रंगेहाथ पकडले 

सदरच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर समाधान महाजन व भानुदास मते यांनी मक्तेदाराकडे ८० हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार पथकाने सापळा रचण्यात आला. यानंतर पथकाने सरपंच, सदस्याचे पती या दोघांसह संतोष पाटील (वय ४९, रा. कल्याणेहोळ, ता. धरणगाव) यांना मुद्देमालासह पकडले. त्यांच्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी इराणचा गेम, आता 'या' देशांवर नेम, ट्रम्प यांचा नवा 'गेम प्लॅन' उघड

इराणच्या आडून अमेरिकेचा चीनवर हल्ला? चीनला ठेचण्यासाठी 'इराण' युद्धभुमी

युद्धानंतर राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान जेलमध्ये जाणार? जेलच्या भीतीमुळेच लादलं जगावर युद्ध?

Maharashtra Live News Update: चांदवड तालुक्यातील मेसण्या डोंगराला आग

Donkey Farming: गाढवांना आला भाव! गाढव पालनासाठी केंद्र सरकारची अनोखी योजना, मिळेल ५० टक्के अनुदान, असा अर्ज करा?

SCROLL FOR NEXT