नवजात मुलीचे अर्भक 
महाराष्ट्र

नवजात मुलीचे अर्भक टोपलीत छतावर ठेवले; ती माता झाली पसार

नवजात मुलीचे अर्भक टोपलीत छतावर ठेवले; महिला झाली पसार

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : येथील श्री मंगळग्रह मंदिर परिसरात शुक्रवारी (ता. १८) एक दिवसाच्या मुलीचे जिवंत अर्भक सापडले असून, तिला येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांच्या कस्तुरबा बालरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. (jalgaon-news-The-new-born-girl-was-placed-in-a-basket-on-the-roof-She-became-a-mother)

अमळनेर (Amalner) येथील मंगळग्रह मंदिराजवळ असलेल्या दुकान क्रमांक दहाच्या छतावर एका टोपलीत गोधडीत गुंडाळलेले हे अर्भक सकाळच्या प्रहरी आढळून आले. तत्काळ पोलिस ठाण्याला माहिती कळवून बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांनी पोलिस प्रशासनास कळवून त्यांच्या परवानगीने तत्काळ उपचार सुरू केले. बाळाचे तापमान २.५ व अंगावर जखमा, अंग थंड झालेले, साखर कमी झालेली आदी लक्षणे दिसून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि प्रसूतीतूनच हे बाळ जन्माला आले असल्याचेही लक्षणांवरून त्यांनी स्पष्ट केले. बाळाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असून, डॉ. बाविस्कर यांनी बाळावर मोफत उपचार केले आहेत.

टोपली ठेवून ती पसार

दरम्यान, या बाळाला जन्म देणारी ती माता कोण, याचा शोध पोलिस घेत असून, या अर्भकास कुत्रे, मांजरापासून कोणताही धोका होऊ नये, यासाठीच जमिनीपासून वर सुरक्षित ठिकाणी आणि टोपलीत गोधडीत गुंडाळून ठेवल्याचे दिसून आले. याबाबत पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस (Police) तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भरदिवसा युवकाची हत्या, शेगाव हादरले

Malaika Arora: फिटनेस क्विन मलाइका अरोराचं वय नक्की किती?

Puran Poli Ice Cream Recipe : सणासुदीला आवर्जून घरी ट्राय करा पुरणपोळी आईस्क्रीम, फॉलो करा सिंपल रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवल्याने काय होते? फायदे की तोटे

Kajal Smudge Tips: काजळ लावल्यावर लगेच पसरतं? मग या ५ टिप्स वापराच, डोळे दिसतील सुंदर अन् टपोरे

SCROLL FOR NEXT