Temperature  Saam tv
महाराष्ट्र

जळगावचे तापमान ४१ अंशावर; दोन दिवसात तीन अंशाने वाढ

जळगावचे तापमान ४१ अंशावर; दोन दिवसात तीन अंशाने वाढ

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरासह जिल्ह्याचे तापमान बुधवारी (ता. १६) ४१ अंशावर पोचले. नंतर मात्र ४० अंशावर तापमान स्थिर झाले. जिल्ह्यात तापमानाचा पारा १६ ते २१ मार्च दरम्यान ४४ अंशापर्यंत जाईल; असा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) अगोदरच दिला होता. त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसात पारा तीन अंशाने वर गेला आहे. (jalgaon news temperature at 41 degrees An increase of three degrees in two days)

जळगावचे (Jalgaon) तापमान मंगळवारी (ता. १५) ३९ अंश नोंदविले गेले होते. असे असताना ४४ अंश तापमान असल्यासारखे चटके लागत होते. बुधवारी ४१ अंशावर तापमान पोचल्याने सर्वांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. अशातही अनेक जण तापमानापासून (Temperature) बचावात्मक साधनांचा वापर करून आपली नियमित कामे करताना दिसत आहे. सकाळी नऊपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले होते.

दोन दिवसात पारा चढला

गेल्‍या आठवड्यात ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेल्‍या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. यामुळे उन्‍हाळा लांबणार अशी शक्‍यता होती. मात्र मागील तीन– चार दिवसांपासून उन्‍हाचा पारा तापू लागला. यानंतर दोन दिवसातच जळगावचे तापमानात तीन अंशाने वाढ होवून पारा ४१ अंशावर पोहचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे दर बदलले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहचले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra News Live Update: पीएम मोदींच्या आव्हानानंतर शरद पवारांची पोस्ट

Maharashtra politics : राष्ट्रवादीत 'भूकंप'; पटेल-तटकऱ्यांची पदे कापली? पार्थ आणि जय पवारांची एन्ट्री, सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण

Navi Mumbai Picnic Spot: खारघरचं सेंट्रल पार्क ते बेलापूरचं पारसिक हिल, नवी मुंबईतील ही 5 ठिकाणे पर्यटकांना घालतायेत भुरळ

चुका तुमच्या अन् भुर्दंड जनतेला का? PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे कडाडले

SCROLL FOR NEXT