suicide 
महाराष्ट्र

मोबाईलमध्ये चित्रीकरण करत गळफास

मोबाईलमध्ये चित्रीकरण करत गळफास

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा भागात २४ डिसेंबरला रात्री धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या सतरा वर्षीय तरुणाने मोबाईलमध्ये चित्रीकरण करून गळफास घेत मृत्यूला कवटाळले. घनश्याम भोई (वय १७) असे मयत तरुणाचे नाव आहे. (jalgaon-news-suicide-case-young-man-Hanging-while-video-filming-in-mobile)

घनश्याम संजय भोई हा आई- वडील, बहीण अशा कुटुंबीयांसह पिंप्राळ्याच्या सेट्रल बँक कॉलनीत राहत होता. कुटुंबातील इतर सर्व नेरी (जामनेर) येथे नातेवाइकांकडे गेले असताना शुक्रवारी रात्री त्याने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार शेजारी महिलेच्या लक्षात आल्याने घटना उघडकीस आली. घटनेची माहिती शेजाऱ्यांनी रामानंदनगर पोलीसांना दिल्यावर पोलिस (Police) पथक घटनास्थळावर दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) हलविण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

चित्रीकरणाचे कारण अस्पष्ट

आत्महत्येचे चित्रीकरण कशासाठी केले, याचा मात्र उलगडा झाला नसून पोलिसांनी घनश्यामच्या खोलीतून स्टॅण्डवर लागलेला मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईलमध्ये गळफास घेतानाचे संपूर्ण चित्रीकरण झाले असून आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध पोलिस घेत आहे. दाखल गुन्ह्याचा तपास साहाय्यक फौजदार अनमेाल पटेल करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT