suicide case 
महाराष्ट्र

चिमुकलीने वडिलांना लटकलेले पाहिले अन्‌ रडत खाली आली

चिमुकलीने वडिलांनी लटकलेले पाहिले अन्‌ रडत खाली आली

Rajesh Sonwane

जळगाव : चिंचोली (ता. जळगाव) येथील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon-news-suicide-case-chincholi-village-young-man-suicide-latenight)

चिंचोली (ता.जळगाव) येथील गणेश शिवाजी गोसावी (वय ३५) हा पत्नी व दोन मुलांसह चिंचोली येथे वास्तव्याला होता. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मंगळवार (ता.३) कामावरून आल्‍यानंतर गणेशने परिवारासोबत रात्री जेवण केले. यानंतर सर्वजण झोपून गेले. तर गणेश हा वरच्या मजल्यावर झोपायला गेले.

वडीलांनी गळफास घेतल्‍याचे चिमुकली पाहिले

यानंतर लागलीच म्‍हणजे रात्री साडेदहाच्‍या सुमारास साडीने गळफास घेतला. ही बाब त्यांची मुलगी परी हिच्या लक्षात आली. यानंतर घटना उघडकीला आली. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्‍येचे कारण समजू शकलेले नाही. मयताच्या पश्चात आई मंगलाबाई, वडील शिवाजी प्रल्हाद गोसावी, पिंटू व सोनू हे दोन भाऊ, पत्नी गुड्डी, मुलगी आणि चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक रतिलाल पवार करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT