Fraud
Fraud Saam tv
महाराष्ट्र

चक्‍क स्टेट बँकेलाच लावला चुना; बनावट कागदपत्राद्वारे सात लाखांचे काढले कर्ज

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सामान्य नोकरदाराला कर्ज घेण्यासाठी नको- नको त्या अटी पूर्ण कराव्या लागतात. गरजवंताला सळो की, पळो करून ठेवणारे नियम लादले जातात. मात्र, एका भुरट्याने सर्व नियमांच्या अडी-अडचणी व अडथळे लिलया पार करून चक्क स्टेट बँकेच्या (State Bank Of India) मुख्य शाखेलाच सात लाखांचा चुना लावला आहे. (jalgaon news State Bank's fraudulent loan of Rs 7 lakh through forged documents)

शहरातील गायत्रीनगरात (Jalgaon News) राहणारा पवन अमरनाथ मिश्रा याने बनावट दस्तऐवज खरे असल्याचे भासवून स्टेट बँकेच्या (Bank) मुख्य शाखेत कर्ज प्रकरण टाकले होते. बँकेने सर्व कागदपत्रांची पळताळणी करून मिश्रा याला ७.०६ लाखांचे कर्ज मंजूर करून ते ३ फेब्रुवारीला अदा केले. बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर कर्जाच्या हप्त्याच्या तारखा सुरू झाल्या. मात्र, कर्जाचे हप्तेच भरले जात नसल्याने बँकेतून संबंधित ग्राहकाला संपर्क करण्यात आला, तर मोबाईल बंद (Fraud) येत होता.

घरी तपास केला असता तो बेपत्‍ता

बँकेच्या कर्मचाऱ्यांनी घर गाठून चौकशी केली, तर घर बंद होते. अखेर त्याची माहिती घेतली असता, तो अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. याबाबत बँक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविले. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेचे व्यवस्थापक सिसीर रघुनाथ पटनाईक (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिसांत पवन अमरनाथ मिश्रा याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार तपास करीत आहेत.

नियोजनबद्ध फसवणूक

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे पवन मिश्रा याने त्याच्या नावाने खोटे दस्तऐवज तयार केले. खोटे दस्तऐवज खरे असल्याचे भासवून त्याने बँकेत कर्जप्रकरण टाकले. ते मंजूर करून घेतले. पैसा हातात पडल्यावर त्याने घरदार सोडून पळ काढला. त्याने इतरही बँकाची फसवणूक केली असल्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT