Silver saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: लाखावर जाणार चांदी; दिवसभरात दीडशे किलोपर्यंत होतेय विक्री

लाखावर जाणार चांदी; दिवसभरात दीडशे किलोपर्यंत होतेय विक्री

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सध्या लग्नसराई नसली तरी सोन्यापेक्षा चांदीचे दागिने व चांदीला ग्राहकांकडून मोठी मागणी सुरू झाली आहे. आगामी काळात चांदीचे दर प्रतिकिलो एक लाखाच्यावर जाणार असल्याचा अंदाज सोने (Gold) बाजारात व्यक्त केला जात आहे. यामुळे रोज पन्नास- साठ किलोने विकली जाणारी चांदी (Silver) अचानक दोन दिवसांपासून शंभर ते दीडशे किलोपर्यंत विकली जात आहे. (jalgaon news Silver price to go to one lakhs)

पैशांची अडचण (Jalgaon) असली, की घरातील सोने, चांदी विकून पैसे करून घेण्याकडे अनेकांचा कल असतो. यामुळे अनेक जण सोने, चांदीत गुंतवणूक करतात. दर कमी झाले, की सोने-चांदी घेतात आणि भाव वाढले, की विकतात. यामुळे खरेदी-विक्री दरतील फरक म्हणजे त्यांचा नफा असे गुंतवणूकदारांचे गणित असते. काही दिवसांपासून चांदीचे दर एक लाख प्रतिकिलो जातील, असा अंदाज सोने बाजाराने (Gold Market) वर्तविला आहे. यामुळे नागरिकांची चांदीला मागणी वाढली आहे.

फायद्याच्‍या आशेने खरेदी वाढली

शहरासह जिल्ह्यातील सराफी दुकानात अचानक चांदीला मागणी वाढणी असल्याचे व्यावसायिक सांगतात. सध्या चांदीचा दर ६४ हजार प्रतिकिलो आहे. तोच दर जर एक लाखावर गेला, तर तेवढाच फायदा या आशेने ग्राहक चांदी खरेदी करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी संधी; भाजपच्या 'या' सर्वात ताकदवर समितीत होणार एन्ट्री?

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

FD Break Rules: FD तोडण्याचा विचार करताय? आधी जाणून घ्या बँक किती पेनल्टी कापते आणि नुकसान कसे टाळाल

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

SCROLL FOR NEXT