जळगाव : जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याच्या चौकशीसाठी नाशिक (Nashik) आयुक्त यांच्याकडून विशेष तपासणी पथक दोन दिवसांपासून मुक्ताईनगरात (Muktainagar) दाखल आहे. यास जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी दुजोरा दिला आहे. (jalgaon news Rohini Khadse attack case Nashik team interrogated in Muktainagar)
जळगाव जिल्हा बँकेच्या (JDCC Bank) माजी अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. रोहिणी खडसे यांच्यावर २७ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान सूतगिरणी ते कोथळी या दरम्यानच्या रस्त्यावर प्राणघातक हल्ला (Rohini Khadse Attack Case) करण्यात आला होता. या हल्ल्याबाबत त्यांनी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिली होता. यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सर्वस्तरावरून सदर हल्ल्याची सीबीआयमार्फत सखोल चौकशीची मागणी झाली. या प्रकरणी नाशिक आयुक्त यांच्याकडून विशेष पथकाची नियुक्ती केली.
चौकशीबाबत अद्याप सस्पेन्स
सदर हल्ल्याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासाठी नियुक्त पथकामध्ये चार ते पाच पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असून सायबर सेलचे विशेष प्रशिक्षित अधिकारी आहेत. सदर पथक दोन दिवसांपासून मुक्ताईनगरात असून चौकशीबाबत मात्र अद्याप सस्पेन्स आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.