Parola News Saam tv
महाराष्ट्र

Parola News : पळासखेडे सिम परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ; हल्‍ल्‍यात शेतकरी जखमी

पळासखेडे सिम परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ; हल्‍ल्‍यात शेतकरी जखमी

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : पळासखेडे सिम (ता. पारोळा) येथे गेल्या अनेक दिवसांपासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. शेतकऱ्यांनी याबाबत वन विभागाला (Forest Department) माहिती दिली होती. तरी देखील याकडे (Parola) दुर्लक्ष झाल्याने १३ जुलैला शेतात काम करताना शेतकऱ्यास मागून हल्‍ला केल्‍याने शेतकरी जखमी झाला आहे. (Tajya Batmya)

पळासखेडे सिम (ता. पारोळा) येथील शेतकरी दिनकर शिवाजी पाटील व त्यांची पत्नी दिनकर पाटील हे दोघेजण त्यांच्या शेतामध्ये कपाशी निंदनीचे काम करत होते. या दरम्‍यान त्यांच्या मागून रानडुक्कर येऊन त्याने शेतकरी दिनकर पाटील यांना जबर धडक दिली. यात सदर शेतकरी हे दगडावरती पडल्याने त्यांच्या डोक्यावर व डोळ्याला इजा झाली. सदर घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी शेतकऱ्यास रुग्णालयात उपचारासाठी नेले.

बंदोबस्त करावा अशी मागणी

दरम्यान शेतीचे दिवस सुरू झाल्याने रानडुकरांचा धुमाकूळ वाढत असल्यामुळे शेतीची कामे करावे की जीव वाचवावा अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. शिवाय रानडुक्कर शेती पिकांचे नुकसान करत आहेत. याबाबत वन विभागाने योग्य ती दखल घेऊन रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT