Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: शालकाला फोन करत रेल्‍वेखाली मारली उडी; शेतीच्‍या वाटणीवरून भावांमध्‍ये होता वाद

शालकाला फोन करत रेल्‍वेखाली मारली उडी; शेतीच्‍या वाटणीवरून भावांमध्‍ये होता वाद

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील कासमवाडी येथे राहणाऱ्या एका रिक्षा चालकाने शेतातील हिस्से वाटणीवरून रागाच्या भरात धावत्या (Railway) रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावात (Jalgaon) घडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे. (Tajya Batmya)

संजय चावदस सपकाळे (वय-५५, रा. कुवारखेडा ता. जळगाव ह.मु. कासमवाडी जळगाव) हे पत्नी व मुलीसोबत वास्तव्याला होते. रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या शेतातील हिस्से वाटणीवरून पाच भावांमध्ये वाद सुरू होता. इतर भावांना शेतातील वाटेहिस्से देण्यात आले होते. परंतु संजय सपकाळे यांना शेतातील कुठलाही हिस्सा देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे माझा हिस्सा मिळावा या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून ते भावांशी भांडण होते.

शालकाला केला फोन

दरम्‍यान मंगळवारी (२३ मे) सकाळी शेतीच्या हिस्से वाटेवरून पुन्‍हा वाद झाला. त्यावेळी भाऊ यांनी शेती देण्यास नकार केला. या संतापाच्या भरात संजय सपकाळे यांनी आसोदा रेल्वे फाट्याजवळ रिक्षा बाजूला लावून शालक गजानन आधार सोनवणे यांना फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगत धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी आसोदा रेल्वेगेटजवळ धाव घेतली होती. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रघुनाथ महाजन यांनी मृतदेहाचा पंचनामा करून (Jalgaon Medical Collage) जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT