Jalgaon News Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case: केळी व्यापाऱ्याची सात लाखांत फसवणूक; एका ट्रकचा सौदा करत दोन ट्रक केले परस्पर नावावर

केळी व्यापाऱ्याची सात लाखांत फसवणूक; एका ट्रकचा सौदा करत दोन ट्रक केले परस्पर नावावर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : केळी व्यापाऱ्याच्या दोन ट्रकांची परस्पर विक्री करून सुमारे सात लाख रुपयांत फसवणूक (Fraud) करण्यात आली. व्यापाऱ्याने एका ट्रकचा सौदा करत (Jalgaon News) दोन ट्रक परस्पर नावावर केल्‍याचा प्रकार केला आहे. (Maharashtra News)

सावदा (ता. रावेर) येथील केळी व्यापारी देविदास राठोड (वय ३७) यांनी ३१ जानेवारीला जळगाव आरटीओ कार्यालयात एजंट शहादत अली यासीन अली (रा. फैजपूर) यांच्या मदतीने मुळ कागदपत्रांची पूर्तता करून ब्रिजेशकुमार प्रकाश यादव (रा. सावदा) यांच्या नावाने ट्रक केला. १९ फेब्रुवारीला देविदास राठोड यांनी ट्रक विक्री केल्याचे स्टेट्‌स ऑनलाइन चेक केले असता, त्यांनी विक्री केलेला ट्रक ब्रिजेशकुमार यादव यांच्या नावाऐवजी अब्दुल रशीद अब्दुल अजीज (रा. मालेगाव) यांच्या नावे असल्याचे आढळून आले.

त्यांचा दुसरा ट्रकचे परिवहन ॲपवर स्टेट्‌स चेक केले असता तो ट्रक ब्रिजेशकुमार यादव यांच्या नावावर दिसून आला. आपण एकच ट्रक विक्री केला असताना, दोन ट्रक वेगवेगळ्या नावावर कशा विक्री झाल्याचे दिसत आहे. म्हणून राठोड यांनी माहिती घेतली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत श्री. राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात ब्रिजेशकुमार यादव व शहादत अली यासीन अली यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT