Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : मित्रांना लोकेशन पाठवून संपविले जीवन; टपाल कर्मचाऱ्याची नैराशेतून पाऊल

Jalgaon News : किनगाव ते चोपडा तालुक्यातील आठ ते दहा खेड्यांमधील टपाल कार्यालयात व्हिजिट अधिकारी म्हणून त्याला तपासणीला जावे लागत होते

साम टिव्ही ब्युरो

साकळी (जळगाव) : नेहमीप्रमाणे कामावर निघाल्यानंतर सायंकाळी टपाल सेवेत कार्यरत असलेल्या एका ३२ वर्षीय तरुण (Jalgaon) कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सदर तरुण हा मागील काही दिवसांपासून नैराश्येत असल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra News)

यावल (Yawal) तालुक्यातील साकळी येथील हनुमानपेठ भागातील रहिवासी असलेला निखिल रवींद्र परिस्कर (कुंभार) (वय ३२) हा काही वर्षांपासून केंद्र सरकारच्या टपाल विभागात नोकरीला होता. दरम्यान तीन ते चार वर्षांपूर्वी त्याला नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ पदावर बढती मिळाली होती. किनगाव ते चोपडा (Chopda) तालुक्यातील आठ ते दहा खेड्यांमधील टपाल कार्यालयात व्हिजिट अधिकारी म्हणून त्याला तपासणीला जावे लागत होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, काही दिवसांपासून निखिल हा मानसिक तणावात होता. निखिल १४ मार्चला सकाळी नेहमीप्रमाणे चोपडा तालुक्यातील काही टपाल कार्यालयांना भेटी देण्याच्या कामानिमित्ताने चोपड्याकडे गेला होता. परंतु सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान निखिलने चोपडा- हातेड रस्त्यावरील पुलाखाली दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेच्या अगोदर नैराशाच्या भावनेने निखिलने काही मित्रांना फोनवर लोकेशन टाकून व फोन करून 'मी आत्महत्या करीत आहे, आता मी तुम्हाला पुन्हा भेटणार नाही असे सांगितले. मित्रांनी तत्काळ शोधाशोध केली. मात्र निखिलचा फोन स्वीच ऑफ असल्याने शोध घेण्यात अपयश आले. अखेर क्रूर नियतीने निखिलचा घात केला. त्याने त्याची मोटारसायकल घटनास्थळी पुलाच्या वर लावलेली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT