Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर पोलीस बंदोबस्‍त

आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर पोलीस बंदोबस्‍त

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : सध्या राज्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरुद्ध राज्यभरात शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. तसेच आमदारांच्या छायाचित्रांना नावांना तसेच कार्यालयावर हल्लाबोल केला जात असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पारोळा येथील (MLA Chimanrao Patil) आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर राज्य पोलीस (Police) कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Jalgaon news Police cordon off MLA Chimanrao Patil and lata sonawane bungalow)

मुंबईत (Mumbai) शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर पारोळा (Parola) येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर पोलीसांचा खडा पहारा लावण्यात आला आहे. दरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था शांततेत असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान सकाळी पाच व रात्री पाच अशी एकूण दहा पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

आमदार सोनवणेंच्‍या बंगल्‍याबाहेर बंदोबस्‍त

जळगाव : जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा मतदार संघातील आमदार लता सोनवणे या देखील एकनाथ शिंदे यांच्‍या गटात सहभागी झाल्‍या आहेत. बंडखोरी केल्‍याने संतप्‍त शिवसैनिकांकडून तोडफोड केली जात आहे. यामुळे सुरक्षा म्‍हणून आमदार लता सोनवणे यांच्‍या जळगावातील बंगल्‍यावर पोलिस सुरक्षा वाढविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT