Child Death 
महाराष्ट्र

दुर्देवी..खेळताना उकळत्‍या दुधात पडला; चिमुरड्याचा मृत्‍यू

दुर्देवी..खेळताना उकळत्‍या दुधात पडला; चिमुरड्याचा मृत्‍यू

Rajesh Sonwane

जळगाव : पिंप्री खुर्द (ता.धरणगाव) येथे बहिणीसोबत घरात खेळत असताना उकळत्‍या दुधात अडीच वर्षीय रोहन पडला. यामुळे तो भाजला गेला होता. त्‍यास तात्‍काळ रूग्णालयात नेले मात्र बालकाचा उपचारादरम्यान मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. (jalgaon-news-pimpri-village-fell-into-boiling-milk-while-playing-little-child-death)

पिंप्री खुर्द येथील रोहन सुभाष धोबी असे या चिमुकल्‍याचे नाव आहे. सदर घटना १३ ऑक्टोबरला घडली. रोहनचे आजोबा डेअरीवर कामाला असून घरी दररोज तीन लीटर दूध येते. सकाळी घराबाहेर चुलीवर दुध तापवायला ठेवले होते. या दरम्यान रोहन बहिणीसोबत खेळत असताना उकळत्या दुधात पडून तो ३६ टक्के भाजला होता. त्याला तात्काळ जळगाव येथे हलवले होते.

मुंबईला नेले पण..

जळगाव येथे प्राथमिक उपचार केल्‍यानंतर बालकाला पुढील उपचारांसाठी १४ ऑक्‍टोंबरला मुंबई येथे नेले. आठ– दहा दिवस उपचार झाल्‍यानंतर २४ ऑक्‍टोंबरला चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बालकाच्‍या मृत्‍यूमुळे आई, वडील व आजोबांनी आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK : पासपोर्टचे रंग वेगवेगळे का असतात ? जाणून घ्या

Breaking News : तब्बल १२००० कोटींचा घोटाळा, जेपी ग्रुपच्या एमडीला ईडीने ठोकल्या बेड्या

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

NHAI Toll System : टोलनाक्यावरील रांगेपासून सुटका, 'या' हायवेवरून आता सुसाट प्रवास, केंद्र सरकारने आणली नवी योजना

Land Calcualtion: आता शेतजमीनीची मोजणी फक्त २०० रुपयात होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT