Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

जीवघेणा शॉर्टकट बोगदा; नागरिकांसह विद्यार्थ्यांना करावी लागते कसरत

जीवघेणा शॉर्टकट बोगदा; नागरिकांसह विद्यार्थ्यांना करावी लागते कसरत

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : बस स्थानकापासून शहरात जाणारा कोणताही रस्ता नव्‍हता. यामुळे तटबंदी तोडून शॉर्टकट रस्ता करण्यात आला. मात्र तो शॉर्टकट रस्ता पादचाऱ्यांसह वाहनधारकांना जीवघेणा ठरू पाहत आहे. (Jalgaon News Parola Palika)

गेल्या अनेक वर्षापासून या शॉर्टकट रस्त्याच्या वापर नागरिक (Parola) पारोळा शहरात जाण्यासाठी करीत आहे. मात्र या शॉर्टकट रस्त्याकडे आज देखील दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्याच्या आतून सांडपाणी जात असल्याने या परिसराचा नेहमीच ओलावा असतो. तसेच पादचारी व वाहनधारकांच्या एकदम गर्दीमुळे मातीची केलेली भर ही पडून त्याचा काहिसा भाग पाण्यात गेला आहे. तसेच गेल्या अनेक दिवसापासून (Rain) पावसाच्या रिपरिपमुळे या भागात पाणी साचल्याने भाग ढासळला गेल्याने तो जीवघेणा ठरवून पाहत आहे.

शॉर्टकट बोगद्याचा तोडलेला भाग बऱ्याच वर्षापासून जीर्ण झाला असून तो कधी ढासडेल हे सांगता येणार नाही. यासाठी जीवघेणा ठरू पाहणारा शॉर्टकट बोगदा रस्‍त्‍याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पादचाऱ्यांकडून बोलले जात आहे. बसस्थानक हे राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे प्रवाशांना ये जा करण्यासाठी शॉर्टकट बोगदा सोडला. तर कजगाव रस्त्याकडून शहरात जावे लागते. पर्यायाने वेळ व पादचार्‍यांना एवढ्या लांबून शहरात येण्याचे अंतर गाठावे लागते. त्यामुळे असंख्य पादचारी व दुचाकी चालक शॉर्टकट बोगद्याच्या रस्त्यातून ये– जा करीत असतात. तसेच या रस्त्यातून अनेक शाळा असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणातून येजा करताना दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT